Monday, March 21, 2011

मी एक कवी ??

रात्र आली की माझी भीती दाटून येते
का कोण जाणे आठवणीची वाट मोकळी होते

सगळे कसे दूर दूर वाटू लागतात
जवळ त्यांच्या जायला मन व्याकुळ होते

त्या मातीचा गंध काही केल्या येत नाही
त्याला शोधण्याची धडपड मात्र सुरु होते

रात्रीच पांघरुण खुप गडद होत जात
दूरच्या दिव्याच साहस मनाला स्पर्शुन जात

एक एक दिवा मालवत असतो
मनातला काहूर पेटतच असतं

परत जेव्हा नवीन पहाट होते
तेव्हा मात्र मी रात्र विसरतो ...
तेव्हा मात्र मी रात्र विसरतो ...

No comments:

Post a Comment